Showing posts with label Blog In Marathi. Show all posts
Showing posts with label Blog In Marathi. Show all posts

Monday, June 25, 2007

The KPO Industry : Why GLOBAL concentrated to INDIA? (Part-III)

Page copy protected against web site content infringement by Copyscape


Source for picture / images : http://images.google.co.in
Click here for
ENGLISH TRANSLATION
विश्वाचा डोळा "भारताकडे" का?
उच्च शिक्षण आणि किमान कौशल्याचं प्रशिक्षण असलेल्या वा घेतलेल्या भारतातील नवीन पिढिची संख्या वाढती आहे. तज्ञांच्या मते ई. सन. २०१० पर्यंत फक्त KPO च्या क्षेत्रामध्ये लाखांवर करियरच्या संधि उपलब्ध होणार आहेत, आणि त्याच प्रमाणे अनेक वेगवेगळ्या विषयातील व्यावसाईकांची आव्यश्यक्ता लागणार आहे. भारतात कधीच कुशल मनुष्यबळाची कमतरता जानवणार नाही. "हा भारतातील BPO चा KPO मध्ये हस्तांतरित होण्याचा काळ आहे असे मत भारतातील कंपनी अलायन्सने व्यक्त केले आहे.
KPO चा हा बिझिनेस भारतात येण्याचे एक आणि एकमेव कारण म्हणजे "कमी पैशात दर्जेदार काम". आपण जर डॉलर मध्ये विचार केला तर, पेटंट अँप्लिकेशनचे लिखानकाम आणि त्याची साठवणुक करण्यासाठी आजघडिला अमेरिका जवळ्पास १०,००० हजार ते १५,००० डाँलर्स एवढा खर्च करते आहे. अमेरीकेने जर हेच काम भारतात करण्यासाठी दिले तर भारतीय चलनात ते जवळजवळ ५०% टक्क्यांची बचत करू शकतात.

कुशल मनुष्यबळ आणि दर्जेदार काम करण्याची प्रवृती आणि व्यावसाईकता यामुळेच बाहेरील कंपन्या त्यांचे काम भारतामध्ये देत आहेत. नासकाँम या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार भविष्यात BPO पेक्षाही KPO क्षेत्राला जास्त भाव येणार आहे. आणि त्याच प्रमाणे ह्या KPO चा टर्णओव्हर २०१० पर्यंत १५.५ दशलक्ष अमेरीकन डॉलरने वाढण्याची शक्यता आहे. कनफेडरेशन आँफ इंडिया चे निष्कर्षही नासकॉम पेक्षा काही वेगळे नाहीत.

आजच्या या परिस्थितित KPO मध्ये काम करणा-या बहुतेक कंपन्या या मोठया स्वरूपाच्या आहेत, त्यापुर्विही BPO क्षेत्राने नाँलेज प्रोसेस आउटसोर्सिंग चे काम स्वतःहून चालू केले आहे. परंतू भविष्यामध्ये लहान तसेच मध्यम स्वरूपाच्या कंपन्यानिही आउटसोर्सिंगसाठी आपली दालने उघडली आहेत.

"कमी पैसा आणि दर्जेदार काम" यावर आधारित बाहेरील कंपन्यांच्या आव्यश्यकतेमुळे यापुढे भारतातील लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्याना भरपूर फायदा होणार आहे. याच कारणामुळे हा बिज्ञिनेस आणि त्यातिल करियरच्या संधि ह्या फक्त "मुम्बई-पुणे-बेंगलोर-गुरगाव" अशा मोठया मेट्रो शहरांपुरती मर्यादित न रहाता छोटया छोटया शहरांत नी गावात सुद्धा पोहोचणार आहेत.

भविष्यामध्ये भारत हा एक ज्ञानमुल्यवर्धित, जगाचा एकमेव लिडर बनणार आहे असे ब-याच तत्ववेत्त्यांनी म्ह्टले आहे. भारत हा २०१० पर्यंत "KPOहब" होंणार याची ही नांदिच आहे.

तेंव्हा तयार रहा !!! संधि तुमच्या हातात चालून येते आहे!!!

हेच कारण आहे या विश्वाचा डोळा भारताकडे का आहे.



Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG
07. The KPO Industry : New Horizen (Part-I)
08. The KPO Industry : KPO & BPO (Part-II)


Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Saturday, June 16, 2007

FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG

Page copy protected against web site content infringement by Copyscape


Click here for ENGLISH TRANSLATION


तरूण मुलांसाठी खेळणी तयार करणा-या "लिप फ्रोग" ह्या कंपणीने "फ्लाई (FLY)" नावाचा "पेन काँम्प्युटर" बाजारात आणला आहे. या पेन काँम्प्युटरच्या साहाय्याने एक विशिष्ट डिजीटल पेपर वापरून त्यावर ड्राँइंग काढ़णे तसेच शब्द लिहुन संवाद साधन्याच्या गुणधर्मामुळे याचे वेगळेपण जाणवते. या काँम्प्युटरला नाही हा शब्दच माहिती नसल्यामुळे काय करता येऊ शकते? हा प्रश्नच उदभवत नाही. हा काँम्प्युटर म्हणजे एक अमर्याद्तेचा साठा आहे.

जरा कल्पना करा कि तुम्ही या विशिष्ट डिजिटल पेपर वर कँलक्युलेटर काढला आहे आणि कोणत्याही लिहिलेल्या क्रमांकाचे अथवा चिन्हाचा अचूक आवाज किंवा उच्चार तुम्हाला ऐकु येतोय. हा पेन काँम्प्युटर सहजतेने कुठेही नेता येण्यासारखा असल्यामुळे नविन तरूण पिढिचा हा एक आदर्शमात्र झाला आहे. विशेषतः होमवर्क करण्यासाठी याचा या नवीन तरूण पिढिला खूप उपयोग होतो आहे. "लिप फ्रोग" कंपनीने हा पेन काँम्प्युटर ते १३ वर्ष वयोगट नजरेसमोर ठेउनच तयार केल्यामुळे हा नविन पिढित लोकप्रिय आहे.

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey


Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Friday, June 1, 2007

Surface Computer : Microsoft

Page copy protected against web site content infringement by Copyscape


मायक्रोसाँफ्टने बाजारात एक नविन काम्प्यूटर आणला आहे. हा साध्या टेबलटाँपचे काम्प्यूटरच्या स्क्रीनची रूपांतरित आवृत्ति आहे. केवळ बोटाच्या स्पर्शाने हा काम्प्यूटर वापरता येतो यासाठी माउस आणि कि-बोर्डची अजिबात गरज लागणार नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे. या 'मायक्रोसाँफ्ट सरफेस' मध्ये ७६ सेंटीमीटर चा हार्ड प्लास्टिक टेबलटाँप स्क्रीन आणि टचपँड चे कम करेल त्यामुळे फक्त बोटांच्या मदतिने या स्क्रीन वरील वेगवेगळया फाईल्स पहाता वा हलविता येतिल, फिंगर पेंटिंग करता येईल, जिगसाँ पझल सोडवता येईल अगदी होटेलचा व्हर्चुंअल मेनुही निवडता येईल.

या टेबलवर ठेवलेले एखादे उपकरणही या कंप्यूटरच्या मदतीने वापरता येईल आणि सेलफोनधारकांना स्टोअर्स मधिल रिंगटोन विकत घेता येतिल किंवा मोबाईलचा प्लानही बदलता येऊ शकेल. काम्प्युटरवर डिजीटल कँमेरा ठेवल्यास या टेबलभोवती बसून एकत्र फोटो पहाता येतिल. साँफ्टवेअरसाठी प्रसिद्ध असलेली मायक्रोसाँफ्ट कंपनी या काम्प्युटरचे हार्डवेयर ही स्वतःच तयार करणार आहे.

नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारचे पहिले कंप्यूटर हे शेरेटाँन होटल्स, हेरोज कसीनो, टी-मोबाइल स्टोअर्स आणि रेस्टोरंटसना देण्यात येणार आहेत. या प्रत्येक सरफेस कंप्यूटर ची किंमत ते १० हजार अमेरिकन डाँलर्सच्या दरम्यान असेल.

Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Related Links :

01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)

Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)

Page copy protected against web site content infringement by Copyscape


संगणकाचा 'माउस' जर चुकिच्या पद्धतीने वापरला तर 'माउस आर्म' नावाचा विकार जडू शकतो, असा इशा-याचा धोका' जर्मन असोसिएशन ऑफ़ नर्व डाँक्टर्स' या संस्थेच्या प्रमुख फ्रैंक बर्गमन यांनी दिला आहे. या आजाराचे स्वरुप 'सततच्या ताणामुळे होणारी इजा' असे असल्याचे मतही बर्गमन यांनी त्यांच्या गटातिल संशोधकांनि सांगितले आहे.

"हाताला सतत मुंग्या येणे, बधिरपणा आणि अशक्तपणा जाणवणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. 'माउस' सतत 'क्लिक' करणे आणि त्यावर चुकिच्या पद्धतीने हात ठेवणे यामुळे हातातील पेशिंना इजा पोहोचते, कालांतराने हातातिल रक्त वाहिन्यांच्या जाळयाची क्रिया मंदावते. काही वेळेस आजाराच्या सुरुवातिलाच 'क्लिक' करताना, मेंदू होत असलेल्या वेदना टिपतो. त्यानंतर प्रत्येक वेळी 'माउस' हलविताना वेदना होत रहातात आणि इजा गंभीर होत जाते". असे बर्गमन यांनी सांगितले. "थोडेसे वजन उचलले तरी मनगटामध्ये वेदना जाणवल्यास न्युरोलोजिस्ट्ची भेट घ्या" एवढा एकच सल्ला बर्गमन यांनी दिलेला आहे. डाँक्टरकडे जाण्यास तुम्ही जेवढ़ा वेळ कराल तेवढा हा आजार अधिक बळावेल कायमची तुमची साथ करेल.

"माउस वापरताना काय काळजी घ्याल?"

०१. 'माउस' चा वापर कमीतकमी करा.
०२. अधिकाधिक सुचना 'कि-बोर्ड' च्या मदतीने घ्या.
०३. 'माउस' च्या पृष्टभागावर मऊ कापड ठेवा.
०४. हाताच्या आकारानुसार 'माउस' चा आकार निवडा.
०५. हाताचे व्यायाम, मनगटाच्या योग्य हालचाली आणि दर अर्ध्या तासाने काही मिनिटांसाठी 'माउस' वरून हात बाजुला काढा.

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L


Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog

Related Links :

01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L