मायक्रोसाँफ्टने बाजारात एक नविन काम्प्यूटर आणला आहे. हा साध्या टेबलटाँपचे काम्प्यूटरच्या स्क्रीनची रूपांतरित आवृत्ति आहे. केवळ बोटाच्या स्पर्शाने हा काम्प्यूटर वापरता येतो यासाठी माउस आणि कि-बोर्डची अजिबात गरज लागणार नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे. या 'मायक्रोसाँफ्ट सरफेस' मध्ये ७६ सेंटीमीटर चा हार्ड प्लास्टिक टेबलटाँप स्क्रीन आणि टचपँड चे कम करेल त्यामुळे फक्त बोटांच्या मदतिने या स्क्रीन वरील वेगवेगळया फाईल्स पहाता वा हलविता येतिल, फिंगर पेंटिंग करता येईल, जिगसाँ पझल सोडवता येईल अगदी होटेलचा व्हर्चुंअल मेनुही निवडता येईल.
या टेबलवर ठेवलेले एखादे उपकरणही या कंप्यूटरच्या मदतीने वापरता येईल आणि सेलफोनधारकांना स्टोअर्स मधिल रिंगटोन विकत घेता येतिल किंवा मोबाईलचा प्लानही बदलता येऊ शकेल. काम्प्युटरवर डिजीटल कँमेरा ठेवल्यास या टेबलभोवती बसून एकत्र फोटो पहाता येतिल. साँफ्टवेअरसाठी प्रसिद्ध असलेली मायक्रोसाँफ्ट कंपनी या काम्प्युटरचे हार्डवेयर ही स्वतःच तयार करणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारचे पहिले कंप्यूटर हे शेरेटाँन होटल्स, हेरोज कसीनो, टी-मोबाइल स्टोअर्स आणि रेस्टोरंटसना देण्यात येणार आहेत. या प्रत्येक सरफेस कंप्यूटर ची किंमत ५ ते १० हजार अमेरिकन डाँलर्सच्या दरम्यान असेल.
Related Links :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)