संगणकाचा 'माउस' जर चुकिच्या पद्धतीने वापरला तर 'माउस आर्म' नावाचा विकार जडू शकतो, असा इशा-याचा धोका' जर्मन असोसिएशन ऑफ़ नर्व डाँक्टर्स' या संस्थेच्या प्रमुख फ्रैंक बर्गमन यांनी दिला आहे. या आजाराचे स्वरुप 'सततच्या ताणामुळे होणारी इजा' असे असल्याचे मतही बर्गमन यांनी व त्यांच्या गटातिल संशोधकांनि सांगितले आहे.
"हाताला सतत मुंग्या येणे, बधिरपणा आणि अशक्तपणा जाणवणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. 'माउस' सतत 'क्लिक' करणे आणि त्यावर चुकिच्या पद्धतीने हात ठेवणे यामुळे हातातील पेशिंना इजा पोहोचते, कालांतराने हातातिल रक्त वाहिन्यांच्या जाळयाची क्रिया मंदावते. काही वेळेस आजाराच्या सुरुवातिलाच 'क्लिक' करताना, मेंदू होत असलेल्या वेदना टिपतो. त्यानंतर प्रत्येक वेळी 'माउस' हलविताना वेदना होत रहातात आणि इजा गंभीर होत जाते". असे बर्गमन यांनी सांगितले. "थोडेसे वजन उचलले तरी मनगटामध्ये वेदना जाणवल्यास न्युरोलोजिस्ट्ची भेट घ्या" एवढा एकच सल्ला बर्गमन यांनी दिलेला आहे. डाँक्टरकडे जाण्यास तुम्ही जेवढ़ा वेळ कराल तेवढा हा आजार अधिक बळावेल व कायमची तुमची साथ करेल.
"माउस वापरताना काय काळजी घ्याल?"
०१. 'माउस' चा वापर कमीतकमी करा.
०२. अधिकाधिक सुचना 'कि-बोर्ड' च्या मदतीने घ्या.
०३. 'माउस' च्या पृष्टभागावर मऊ कापड ठेवा.
०४. हाताच्या आकारानुसार 'माउस' चा आकार निवडा.
०५. हाताचे व्यायाम, मनगटाच्या योग्य हालचाली आणि दर अर्ध्या तासाने काही मिनिटांसाठी 'माउस' वरून हात बाजुला काढा.

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
Related Links :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L