Source for picture / images : http://images.google.co.in
Click here for ENGLISH TRANSLATION
विश्वाचा डोळा "भारताकडे" का?
उच्च शिक्षण आणि किमान कौशल्याचं प्रशिक्षण असलेल्या वा घेतलेल्या भारतातील नवीन पिढिची संख्या वाढती आहे. तज्ञांच्या मते ई. सन. २०१० पर्यंत फक्त KPO च्या क्षेत्रामध्ये लाखांवर करियरच्या संधि उपलब्ध होणार आहेत, आणि त्याच प्रमाणे अनेक वेगवेगळ्या विषयातील व्यावसाईकांची आव्यश्यक्ता लागणार आहे. भारतात कधीच कुशल मनुष्यबळाची कमतरता जानवणार नाही. "हा भारतातील BPO चा KPO मध्ये हस्तांतरित होण्याचा काळ आहे असे मत भारतातील कंपनी अलायन्सने व्यक्त केले आहे.
KPO चा हा बिझिनेस भारतात येण्याचे एक आणि एकमेव कारण म्हणजे "कमी पैशात दर्जेदार काम". आपण जर डॉलर मध्ये विचार केला तर, पेटंट अँप्लिकेशनचे लिखानकाम आणि त्याची साठवणुक करण्यासाठी आजघडिला अमेरिका जवळ्पास १०,००० हजार ते १५,००० डाँलर्स एवढा खर्च करते आहे. अमेरीकेने जर हेच काम भारतात करण्यासाठी दिले तर भारतीय चलनात ते जवळजवळ ५०% टक्क्यांची बचत करू शकतात.
कुशल मनुष्यबळ आणि दर्जेदार काम करण्याची प्रवृती आणि व्यावसाईकता यामुळेच बाहेरील कंपन्या त्यांचे काम भारतामध्ये देत आहेत. नासकाँम या संस्थेने केलेल्या सर्वेनुसार भविष्यात BPO पेक्षाही KPO क्षेत्राला जास्त भाव येणार आहे. आणि त्याच प्रमाणे ह्या KPO चा टर्णओव्हर २०१० पर्यंत १५.५ दशलक्ष अमेरीकन डॉलरने वाढण्याची शक्यता आहे. कनफेडरेशन आँफ इंडिया चे निष्कर्षही नासकॉम पेक्षा काही वेगळे नाहीत.
आजच्या या परिस्थितित KPO मध्ये काम करणा-या बहुतेक कंपन्या या मोठया स्वरूपाच्या आहेत, त्यापुर्विही BPO क्षेत्राने नाँलेज प्रोसेस आउटसोर्सिंग चे काम स्वतःहून चालू केले आहे. परंतू भविष्यामध्ये लहान तसेच मध्यम स्वरूपाच्या कंपन्यानिही आउटसोर्सिंगसाठी आपली दालने उघडली आहेत.
"कमी पैसा आणि दर्जेदार काम" यावर आधारित बाहेरील कंपन्यांच्या आव्यश्यकतेमुळे यापुढे भारतातील लहान आणि मध्यम स्वरूपाच्या कंपन्याना भरपूर फायदा होणार आहे. याच कारणामुळे हा बिज्ञिनेस आणि त्यातिल करियरच्या संधि ह्या फक्त "मुम्बई-पुणे-बेंगलोर-गुरगाव" अशा मोठया मेट्रो शहरांपुरती मर्यादित न रहाता छोटया छोटया शहरांत नी गावात सुद्धा पोहोचणार आहेत.
भविष्यामध्ये भारत हा एक ज्ञानमुल्यवर्धित, जगाचा एकमेव लिडर बनणार आहे असे ब-याच तत्ववेत्त्यांनी म्ह्टले आहे. भारत हा २०१० पर्यंत "KPOहब" होंणार याची ही नांदिच आहे.
तेंव्हा तयार रहा !!! संधि तुमच्या हातात चालून येते आहे!!!
हेच कारण आहे या विश्वाचा डोळा भारताकडे का आहे.
Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG
07. The KPO Industry : New Horizen (Part-I)
08. The KPO Industry : KPO & BPO (Part-II)