Showing posts with label Horizen. Show all posts
Showing posts with label Horizen. Show all posts

Monday, June 18, 2007

The KPO Industry : New Horizen (Part-I)

Page copy protected against web site content infringement by Copyscape
Source for Pictures/Images: http://images.google.co.in/

Click here for ENGLISH TRANSLATION

KPO म्हणजे नेमकं काय?

KPO म्हणजे "नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग". आउटसोर्सिंगच्या जगातिल व या क्षेत्रातिल BPO नंतरचं, अतिशय महत्वाचं व करियरच्या भरपूर संधि असणार क्षेत्र. या मध्ये "नॉलेज" म्हणजेच माहिती किंवा ज्ञानाची देवानघेवान होते. KPO ही BPO ची एक पुढील पायरी आहे असे म्हणायला हरकत नाही.

एखाद्या विशिष्ट क्षेत्रातलं, विशेष ज्ञान असणा-या व्यक्तिकडे बाहेरिल कंपन्या त्यांच्याजवळ असणारं काम देतात आणि हे प्रोफेशनल लोक ते काम विशिष्ट कालावधीमध्ये, स्वतः जवळचे ज्ञान आणि कौशल्य वापरून, ते काम एक ठराविक रक्कम घेवुन पूर्ण करून देतात. मागील काही वर्षापुर्वीपर्यंत आपल्या जवळच्या ज्ञानाला योग्य अशी संधि मिळविण्यासाठी त्याला स्वतःच घरदार, स्वतःच शहर, स्वतःच देश सोडून ज्या ठिकानी ती संधि उपलब्ध आहे तिथे जावे लागत असे. अशा परिस्थितिला स्थलांतराशिवाय शिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत अथवा उपलब्ध नव्हता. या माहिती तंत्रज्ञानाच्या (INFORMATION TECHNOLOGY) विकासामुळे आता अशा शारीरिक स्थलांतराची आवश्यकता अथवा गरजच उरली नाही. हया KPO इंडस्ट्रिजच्या वाढत्या व्यापामुळे घर बसल्या आपल्या ज्ञानाला वा हुशारीला योग्य संधि उपलब्ध होऊ शकते. तुम्ही तुमच्या घरात राहून जगातिल कोणत्याही कंपनिसाठी काम करू शकता.

भारताचा ज्ञान साठा:

कालपर्यंत भारतीय कंपन्या फक्त "साँफ्टवेअर कुली" पूरवित होत्या, परंतू आता ही परिस्थिति लवकरच बदलाच्या मार्गावर येउन ठेपली आहे. भारतीय कंपन्या सध्याच्या वास्तवाला अनुसरून जवळपास सर्वकाही हस्तगत करण्याच्या पात्रतेमागे लागल्या आहेत, एवढेच नाही तर राँकेट सायन्स सुद्धा !! KPO मध्ये कोंणकोणत्या क्षेत्राला संधि असेल? (पुढील येणा-या ५ वर्षाँमध्ये KPO चं काम कोंणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढेल?) सध्याच्या परिस्थितित भारतातुन खालील क्षेत्रामध्ये या सेवा पुरविल्या जातात.

१. टेलिकॉम
२. तंत्रज्ञान
३. माध्यम आणि मनोरंजन
४. अर्थविषयक सेवा
५. कंज्ञ्युमर प्राँडक्टस आणि रिटेल
६. आँटोमोटिव्ह
७. प्रशिक्षण आणि सल्ला
८. नेटवर्क म्यँनेजमेंट
९. एरोस्पेस / अंतराळ संशोधन
१०. माहिती विश्लेषण
११. बौद्धिक संपदा संशोधन
१२. लेखन, प्रकाशन
१३. कायदा
१४. वैद्यकिय सेवा
१५. फार्मासुटिकल्स आणि बायोटेक्नाँलाँजी
१६. लर्निंग सोल्यूशन
१७. अनिमेशन आणि डिजाइन
१८. अभियांत्रिकी सेवा
१९. व्यावसाईक आणि तांत्रिक विश्लेषण
२०. संशोधन आणि विकास

या वरिल सर्व सेवा मोठया प्रमाणात आउटसोर्स होण्यास पूर्णपणे सुरूवात झाली आहे असे म्हणता येणार नाही. थोड्याफार प्रमाणात या सेवा पुरविण्यास सुरूवात झालेली आहे. परंतु येणा-या पुढील ५ वर्षांमध्ये या वरील सर्व सेवांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंगची ही कामं भारतीय कंपन्यांमध्ये येत आहेत.

Articles to Read :
01. INDIANS=>Don't Buy P-E-T-R-O-L
02. Beware of MOUSE (MOUSE ARM !!!)
03. Surface Computer : Microsoft
04. The Road is Never Long Between Friends !!!
05. Principle of Life !!! By Stephen Covey
06. FLY PEN TOP COMPUTER by LEAP FROG


Blogarama - The Blog Directory Automotive Blogs - Blog Catalog Blog Directory Promote Your Blog