Tuesday, January 24, 2012

Mercer's Cost of Living Survey : Bengaluru Is The Best City

Bengaluru
सर्वोत्तम राहणीमान, जीवनस्तर असलेली आणि सर्वाधिक सुविधा पुराविणारी जगातील आदर्श शहरे कोणती? या संदर्भात "HR Consultancy Mercer" या कंपनीने जागतिक पातळीवर सर्वेक्षण केले. जगातील २२१ शहरांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणातून IT City Bengaluru ची भारतातील सर्वोत्तम शहर म्हणून निवड केल्या गेली आहे.

Bengaluru City
राहणीमान, जीवनस्तर आणि सुविधांच्या बाबतीत Bengaluru हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. जागतिक यादीत मात्र या भारतीय शहराला १४२ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. Delhi, Mumbai आणि Kolkata या शहरांच्या राहणीमान आणि जीवनातही सुधारणा झाल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. विशेष म्हणजे जागतिक यादीत गेल्या वर्षीही Bengaluru ला १४२ वी रँकच मिळाली होती.

Delhi च्या रँकमध्ये स्थानांची सुधारणा होउन ते १४३ व्या, तर मुंबई ची स्थानांची प्रगति होउन ते १४४ व्या क्रमांकावर गेले आहे. या जागतिक यादीत Austria ची राजधानी Vienna ला पहिला, तर Switzerland मधील Zurich Geneva ला अनुक्रमे दूसरा तिसरा क्रमांक मिळाला आहे. Vancouver आणि Oakland ला संयुक्तपणे चौथा, Jermany तिल Düsseldorf, Frankfurt आणि Munich ला अनुक्रमे पाचवा, सहावा सातवा क्रमांक मिळाला आहे. आशियाई शहरात Singapore ला २८ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

Source : Mercer's Cost of Living Survey

No comments: